राज्यमंत्री अतुल सावे यांचे कार्यकर्त्यांकडून शहरात जंगी स्वागत

Foto
औरंगाबाद पूर्व चे भाजपचे आमदार अतुल सावे मंत्रिमंडळ विस्तरामध्ये उद्योग आणि अल्पसंख्याक खाते मिळाल्यानंतर आज त्यांचं औरंगाबाद शहरात आगमन झाले या वेळी शहराच्या नागरनाका येथे  शहरभाजप च्या वतीने त्यांचा  ढोल ताशे, फटाक्याच्या अतिषबाजीने त्यांचे  जंगी स्वागत करण्यात आले. उद्योग मंत्री सावे यांनी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत शहरात प्रवेश केला.  व तेथून वाहन रॅलीद्वारे शाहिदस्तंभला अभिवादन करून पुढे क्रांतिचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली शहरात पुढे गेली. 

  या वेळी  मराठवाडा विकास महामंडळ चे अध्यक्ष डॉ. भगवंत कराड, शहरअध्यक्ष  किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर, नगरसेवक राज वानखेडे, प्रमोद राठोड, माजी नगरसेवक अनिल मक्रिये, जिल्हा चिटणीस संजय फत्तेलष्कर,  जिल्हा चिटणीस राजेंद्र कचरे, अभिजित जिरे, कैलास पुसे सह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची मोठी गर्दी  होती

सावे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म व अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्रिपद आहे. गेले आठवडाभर विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने त्यांना आपला तळ मुंबईतच ठोकावा लागला.  रविवारी सकाळी सावे यांचे औरंगाबाद शहरात आगमन झाले. यासाठी कार्यकर्त्यानी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून भव्य वाहन रॅली ने त्यांचे स्वागत करण्यात आले.